काळेवाडी येथील विजयनगर भागातील सेंट पॉल चर्चची मोडकळीस आलेली संरक्षक भिंत पडून एका मुलाचा मृत्यू झाला, तर इतर तिघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने दुसऱ्या बाजूचीही भिंत पडली.
स्वप्निल लुईस (वय १३, रा. विजयनगर, काळेवाडी), अमन ऊर्फ केतन तायडे, अथर्व माळी आणि दिनेश नखाते अशी इतर जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट पॉल चर्चच्या जुने चर्च असून त्याच्या शेजारी सेन्ट अल्फान्सो स्कूलचे पूर्वी हॉकीचे मैदान होते. या भिंतीशेजारी स्वप्निल व त्याचे मित्र सकाळी क्रिकेट खेळत होते. मैदानावर क्रिकेट सामना सुरू असताना स्वप्निल व त्याचे मित्र या भिंतीजवळ उभे होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक भिंत पडली. यामध्ये स्वप्निल व त्याचे मित्र जखमी झाले. येथील नागरिकांनी जखमींना बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, स्वप्निल हा याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. इतर तिघांची प्रकती स्थिर आहे. दरम्यान, घटनेनंतर नागरिकांनी चर्चची उर्वरित संरक्षक भिंत पाडून टाकली. घटनेनंतर सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस. के. मुजावर यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.