पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढीविरोधात विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे सुरू करण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करून अधिकार मंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>लवकरच विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकची परीक्षा मराठी भाषेतून देता येणार; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

विद्यापीठाच्या शुल्कवाढीला विरोध करण्यासाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे आंदोलन सुरू करण्यात आले होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, आमदार रोहित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करून अधिकार मंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.