पुणे: परकीय आक्रमक क्रूरशासक औरंगजेब याचे आपल्या देशात आणि आपल्या मातृभूमीवर उदात्तीकरण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे, प्रतापगड च्या पायथ्याशी जशी अफजल खानाच्या कबरीच्या आजूबाजूला अतिक्रमण झाली. तसेच संभाजीनगरमध्ये अतिक्रमण झाली आहेत, तीच नष्ट व्हावी, अशा मागण्या करीत पतित पावन संघटना पुणे शहराच्या लाल महाल चौक येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पतित पावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष स्वप्नील नाईक म्हणाले, परकीय आक्रमक, क्रूर शासक औरंगजेब याचे उदात्तीकरण करणाऱ्यांचे विरोधात आंदोलन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी आणि थोर पुरुष यांची अवेहलना करणाऱ्यांच्या विरोधात कठोर तसेच सक्षम कायदा निर्माण व्हावा.प्रसारमाध्यमांवर (इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर व्हाट्सअप) औरंगजेबाचा उदत्तीकरण करणारे व छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विरोधात पोस्ट करणारे किंवा चुकीचा इतिहास पसरवणारे यांच्यावर त्वरित कारवाई होण्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र समिती गठीत करावी, या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त यासारख्या उच्चस्तरीय अधिकारी नेमण्यात यावा,अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
तसेच ते पुढे म्हणाले, औरंगजेबाचे उद्दतीकरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि धर्मवीर संभाजीराजांनी केलेल्या बलिदानाचा अवमान आहे. औरंगजेबाचे उद्दातीकरण करणे म्हणजे आपल्या भारतीय कायदा सुव्यवस्था, संविधानाचा अपमान करणे आहे.औरंगजेबाच्या प्रतिमेचे आज दहन करण्यात आले असून २२ मार्च पर्यंत जर औरंगजेबाची कबर या भारत भूमीतून निघाली नाही, तर २३ मार्चला तर त्याच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन याच पुण्याच्या कसब्यात केले जाईल,असा इशाराही त्यांनी दिला.