भोसरी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक आणि कामगारांनी खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करून खड्ड्यांच्या गंभीर समस्यांकडे पिंपरी महापालिकेचे लक्ष वेधले. खड्ड्यांची दुरुुस्ती होते. त्याच ठिकाणी खड्डे होतात, असे सांगून रस्ते दुरुस्तीच्या कामांमधील निकृष्टपणा आंदोलकांनी दाखवून दिला.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. या वेळी खड्ड्यांमध्ये वृक्षलागवड करण्यात आली. औद्योगिक पट्ट्यात विशेषत: टी ब्लॉक परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.

Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
10 kg ganja seized in pune
मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची तस्करी करणारे गजाआड, खडकी परिसरात कारवाई; दहा किलो गांजा जप्त
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
rickshaw driver punched police crime against wife mother along with rickshaw driver
जनता वसाहतीत ‘रुट मार्च’ अडवून रिक्षाचालकाकडून पोलिसांना धक्काबुक्की
Pune redevelopment old buildings, Pune old buildings, Stalled redevelopment old buildings pune,
पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !

हेही वाचा : पुणे : करोनानंतर तरुणांमध्ये वाढतोय सांधेदुखीचा त्रास

खड्ड्यामुळे कामगारांचे दररोज अपघात घडत आहेत. या खड्ड्यांची दुरुस्ती झाल्यानंतरही पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडतात. अतिशय निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. उद्योजकांकडून नियमितपणे कर भरण्यात येतो. मात्र आवश्यक सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते, असे भोर यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे : स्वप्नमहालातील हलत्या झोपाळ्यावर मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची होणार प्रतिष्ठापना

आवश्यक सुविधा न दिल्यास करभरणा बंद करण्याचे आवाहन उद्योजकांना करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. उद्योजक वैभव जगताप, चंद्रकांत ठक्कर, मतीन शेख, सोनू ओहरी, कल्याण पांचाळ, आकाश बनसोडे, संकेत थोरात आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.