सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहातील जेवण निकृष्ट असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी बुधवारी भोजनगृह बंद केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला.विद्यापीठाच्या भोजनगृहातील खाद्यपदार्थांचा दर्जा निकृष्ट झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी सातत्याने तक्रार करत आहेत. मात्र विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही बुधवारी भोजनगृह बंद ठेवले. पदार्थांचा दर्जा न उंचावल्यास व्यापक लढा उभा केला जाईल, असे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या तुकाराम शिंदेने सांगितले. तर भोजनगृहातील दर्जा घसरला आहे. या बाबत विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा >>>पुणे:अद्याप निम्मेच कारखाने सुरू; उसाच्या गळीत हंगामाला गती येईना
विद्यापीठ प्रशासनाने तातडीने भोजन समिती स्थापन करावी.त्यात विद्यार्थी प्रतिनिधींना समाविष्ट करावे, असे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या राहुल ससाणे याने सांगितले.विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, विद्यापीठातील आवारातील भोजनगृहातील भोजनाची उच्च गुणवत्ता राखण्यासाठी सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येत असून, त्यात विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश केला जाईल.