नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते.अस विधान केल होत.त्या विधानानंतर राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी गंगा जलने अभिषेक करून आणि पुष्पहार अर्पण करून अजित पवारांच्या विधानाचा निषेध नोंदविला. यावेळी अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा- ‘मतांसाठी लाचार होऊन अजित पवारांनी विधान केलं’; संभाजी राजेंबाबतच्या विधानानंतर भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका
यावेळी आनंद दवे म्हणाले की, २०१८ रोजी संभाजी राजे यांचा उल्लेख अजित पवार यांनी ट्विटमध्ये धर्मवीर असा उल्लेख केला होता. पण आता अजित पवार किंवा जितेंद्र आव्हाड यांना संभाजी राजे हे धर्मवीर वाटत नाही. आता त्यांनी स्वतःची अक्कल पाजळण्याची गरज असून राष्ट्रवादीमधील काही नेत्यांकडून पद्धतशीरपणे आदर्श पुरुषांची बदनामी करण्याची मोहीम हाती घेतल्याच दिसत आहे.त्या कृतीचा हिंदू महासंघ निषेध करित असल्याच त्यांनी सांगितले.
हेही वाचा- पुणे, नवी मुंबईत दुचाकी चोरणारे गजाआड, ४ दुचाकी जप्त
तसेच ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी एवढं मोठ विधान करून देखील खासदार उदयनराजे किंवा संभाजी राजे का भूमिका मांडत नाही.त्या दोघांना अजित पवार यांच वक्तव्य मान्य आहे का ? ते धर्म प्रेमी किंवा धर्मवीर नव्हते ? त्यावर दोघांनी भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.