लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: औंध येथील जिल्हा रुग्णालयाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास करण्याबाबत मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. या माध्यमातून रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा आरोग्य मंत्र्यांचा डाव असल्याचा दावा करत ठाकरे गटाकडून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. औंध जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण होऊ देणार नाही, खासगीकरण करण्याचा आरोग्य मंत्री सावंत यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.