लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची तात्पुरती निवडयादी जाहीर करण्यात आली. मात्र ६५ पदांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. सुनील कचकड यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून, निर्मलकुमार भोसले यांनी दुसरा, तर गणेश जाधव यांनी तिसरा क्रमांक मिळवला.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल रखडला होता. हा निकाल जाहीर करण्याची मागणी सातत्याने उमेदवारांकडून करण्यात येत होती. अखेर हा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय मागवण्यात आला आहे. त्यासाठी ११ जुलै ही अंतिम मुदत आहे.

आणखी वाचा-पुणे नॉलेज क्लस्टरतर्फे विद्यार्थिनी, उद्योजक महिलांसाठी शिष्यवृत्ती; अर्जांसाठी २५ जुलै अंतिम मुदत

जाहीर करण्यात आलेली निवड यादी तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जांमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे, प्रमाणपत्रांची पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारसीमध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या आरक्षणाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गासाठी राखीव पदांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले.