पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात सातारा जिल्ह्यातील दिवड येथील अमोल घटुकडे यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला. एकनाथ अर्जुन लाठे यांनी द्वितीय, अविनाश जालिंदर आवारे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. चार पदे राखून ठेवून उर्वरित ५९९ पदांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. उमेदवारांच्या अर्जातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारसींमध्ये बदल होऊ शकतो. खेळाडू आणि अनाथ प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून पडताळणीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू, अनाथ प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरून त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात आला आहे.

mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
nadi tarangini latest news in marathi
‘नाडी तरंगिणी’द्वारे अचूक नाडी परीक्षा! पुण्यातील नवउद्यमीने विकसित केले डिजिटल उपकरण
Maharashtra Board s Class 12admit card will be available online from Friday January 10
राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
MPAC Mantra Intelligence Test and Arithmetic Group B Non Gazetted Services Pre Exam sports news
एमपीएसी मंत्र: बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित; गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा
Sangli school , Sangli , Action program in Sangli,
सांगली : पालिका शाळेतील मुलांचा अध्ययन स्तर सुधारण्यासाठी सांगलीत कृती कार्यक्रम
ladki bahin yojana inspection of application forms
‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जांची पडताळणी

हेही वाचा – शीव उड्डाणपुलावरील वाहतूक बंद, प्रवासाचा वेळ वाढला

हेही वाचा – सागरी किनारा मार्गाविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली, मार्गावरील प्रवेशयोग्य मोकळ्या जागा ठेवण्याच्या मागणीचा विचार करण्याची सूचना

खेळाडू आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी झाल्यावर या संवर्गाची तात्पुरती निवडयादी आणि भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग आऊट) उपलब्ध करून दिला जाईल. ऑप्टिंग आऊट, आरक्षण विचारात घेऊन अंतिम निवडयादीच्या आधारे उमेदवारांच्या शिफारसी केल्या जातील. संबंधित गुणवत्ता यादी न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणांतील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे. न्यायिक प्रकरणातील आदेशामुळे यादीत बदल होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader