ऑनलाइन जुगारातून करोडपती झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे. सोमनाथ झेंडे यांना ऑनलाइन गेम ड्रीम इलेव्हनमध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले होते. त्यांच्यावर गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं पिंपरी- चिंचवड पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. परवानगी नसताना त्यांनी ऑनलाइन गेम खेळला, त्याचबरोबर गणवेशात माध्यमांमध्ये मुलाखत दिली, पोलीस खात्याची प्रतिमा मालिन केली असा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… पुणे विमानतळावर सँडविच ₹ ३५०, मशिनमधील चहा ₹ १५०! जादा दर अन् दर्जाबाबत प्रवाशांच्या तक्रारी

हेही वाचा… मोठी बातमी! अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटीलला तामिळनाडू येथून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना गेल्या आठवड्यामध्ये ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेममध्ये अव्वल क्रमांक आल्याने तब्बल दीड करोड रुपयेांचे बक्षीस लागले. त्यांची ही बातमी वाऱ्यासारखी अवघ्या महाराष्ट्रभर पसरली. त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. परंतु, त्यांचा आनंद हा फार काळ काही टिकू शकला नाही. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्यांची चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे या करत होत्या, सोमनाथ झेंडे यांना अनेकदा पोलिस आयुक्त चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. अखेर त्यांच्यावर गैरवर्तणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचं निलंबन झाल्यानंतर त्यांना विभागीय चौकशीत स्वतःच म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psi somnath zende suspended by pimpri chinchwad police over online game controversy kjp 91 asj