* ‘समपथिक ट्रस्ट’चे आवाहन *  आज ‘जागतिक अँटी-होमोफोबिया दिन’
‘मानसोपचारतज्ज्ञांनी समलैंगिकतेस आजार मानू नये व तो आजार नसल्यामुळे त्यावर उपचारही करु नयेत. तसेच भारतीय दंडविधानाचे ३७७ कलम रद्द करण्यासाठीच्या चळवळीला मानसोपचारतज्ज्ञांनीही पाठिंबा द्यावा,’ असे आवाहन ‘समपथिक ट्रस्ट’ या संस्थेने केले आहे.
१७ मे हा दिवस ‘जागतिक अँटी- होमोफोबिया दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘इंडियन सायकॅयाट्रिक सोसायटी’ व ‘वर्ल्ड सायकॅयाट्रिक असोसिएशन’ यांनी समलैंगिकतेविषयी प्रसिद्ध केलेली माहिती संस्थेने आपल्या ‘समपथिक- ट्रस्ट- पुणे’ या फेसबुक पानावर सोमवारी उपलब्ध करुन दिली आहे.
मानसोपचारतज्ज्ञांच्या या संस्थांनी समलैंगिकता हा आजार नसल्याचे सांगितले आहे, तसेच समलैंगिकतेवर केले जाणारे उपचार त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानिकारक असून ते अनैतिक असल्याचेही सांगितले आहे. समलिंगी संबंध गुन्हा ठरवला जाऊ नये व समलैंगिक व्यक्तींना सर्व मानवी व राजकीय अधिकार मिळावेत. तसेच शिक्षण संस्था, नोकरी व राहण्याच्या ठिकाणी त्यांच्याबरोबर भेदभाव होऊ नये, असेही मानसोपचारतज्ज्ञांच्या संस्थेने म्हटले आहे, अशी माहिती ‘समपथिक’तर्फे देण्यात आली.

Story img Loader