लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कोझी आणि ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. जामीन अर्जावर बुधवारी (२९ मे) सुनावणी होणार आहे.

Crime against office bearers of society in Aundh for excommunicating a computer engineer
संगणक अभियंत्याला बहिष्कृत केल्याप्रकरणी औंधमधील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, न्यायालयाच्या आदेशाने कारवाई
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Malad accident case, Five people arrested,
मालाड दुर्घटनाप्रकरणी पाच जणांना अटक
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या
Two sent to Yerawada jail in Kalyaninagar accident case Pune news
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोघांची येरवडा कारागृहात रवानगी
Bajaj Finance officials beaten up by borrowers in Kanchengaon in Dombivli
डोंबिवलीतील कांचनगावमध्ये बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना कर्जदारांकडून मारहाण
Kalyaninagar accident case
कल्याणीनगर अपघात प्रकरण: रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अगरवाल दाम्पत्य, डॉक्टरांसह इतरांचा जामीन अर्ज फेटाळला

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला मोटार दिल्याप्रकरणी त्याचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल सुरेंद्र अगरवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) याच्यासह मद्यविक्री प्रकरणात कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर), ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा), कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा), व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात भुतडा, काटकर, सांगळे, शेवानी यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. अगरवाल याला मोटारचालकाला धमकाविल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा-पोर्श अपघातानंतर क्लब मालकांना आली जाग, पुण्यातील उद्योजकाने सांगितली पब्समधील सद्यस्थिती

न्यायालयीन कोठडीत असलेले भुतडा, काटकर, सांगळे, गावकर यांनी शिवाजीनगर न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (२९ मे) सुनावणी होणार आहे.