पिंपरी- चिंचवडमध्ये चक्क यमराज रस्त्यावर उतरले आहेत. हेल्मेट न वापराने आणि वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन वाहतुकीचे नियम पाळावेत अस आवाहन यमराज करत आहेत. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम चिंचवड वाहतूक पोलिसांनी राबवला आहे. वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा यमराज तुम्हाला घेऊन जातील असे आवाहन वाहनचालकांना यमराज करत आहेत. 

हेही वाचा- पुणे : ससून रुग्णालयात ज्येष्ठ महिलेचे सव्वा लाखांचे दागिने लंपास

Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त

प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. किमान आपल्या कुटुंबाचा विचार करून वाहन चालवावीत, असे आवाहन वाहतूक पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केले आहे. पिंपरी- चिंचवड हे मेट्रो शहर आहे. लाखो वाहन शहरात असून अनेकांचा वाहतुक नियमांचे पालन न केल्याने मृत्यू होतो. सिग्नल न पाळणे, ओव्हर स्पीड, हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट अशी वाहतूक नियमांची पायमल्ली वाहनचालक करतात. वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी चिंचवड चौकात चक्क यमराज आले त्यांनी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी चिंचवड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्यासह इतर वाहतूक पोलिस कर्मचारी होते. सिग्नलवर थांबून प्रत्येक वाहनचलकांना नियम पालन करण्याचं आवाहन वाहतूक पोलिस करत होते.