भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) अपेक्षित कामकाज होण्यासाठी राज्यातील नागरी सहकारी बँकांसाठी सहकार आयुक्तालयाकडून जनजागृती मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये कर्ज व्यवहार हाताळणे, सभासद वाढवणे, आरबीआयचे नवे नियम, परिपत्रके समजावून सांगणे आदींचा समावेश आहे. सहकार आयुक्तालयाकडून सोलापूर जिल्ह्यांत नुकताच मेळावा घेण्यात आला असून कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये २३, २४ आणि २५ नोव्हेंबरला मेळावे आयोजित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>मुळा-मुठा नदीकाठ पुनरुज्जीवन योजना ‘गाळात’; पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची संयुक्त निविदा रद्द

महाराष्ट्र राज्य सहकारात कायमच आघाडीवर राहिले आहे. राज्यात सर्वाधिक सहकारी बँका आहेत. सहकारी बँकांमुळे बँकिंग क्षेत्र तळागाळापर्यंत पोहोचले. जिल्हा, तालुका, गावस्तरावर सहकारी बँका उभ्या राहिल्या. मात्र, अलीकडच्या काळात आरबीआयला अपेक्षित असलेले कामकाज होत नसल्याने अनेक सहकारी बँकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्तालयाने हे पाऊल उचलले आहे.
याबाबत बोलताना नागरी सहकारी बँकांचे उपनिबंधक अनंत कटके म्हणाले, ‘आरबीआयला अपेक्षित कामकाज नागरी सहकारी बँकांकडून होण्यासाठी जनजागृती मेळावे सहकार आयुक्तालयाने पुढाकार घेऊन सुरू केले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यांत हा मार्गदर्शनपर मेळावा घेण्यात आला असून २३ नोव्हेंबरला कोल्हापूर, २४ नोव्हेंबरला सांगली आणि २५ नोव्हेंबरला सातारा जिल्ह्यांत हे मेळावे आयोजित केले आहेत. त्यानंतर मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यभरात हे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. बँकेच्या संचालकांमध्ये आरबीआयच्या नियमांबाबत जनजागृती केली जात असून त्यानुसार कामकाज होणे अपेक्षित आहे. हाच प्रमुख हेतू आहे.’

हेही वाचा >>>पुणे: आदर पुनावाला यांची एक कोटीची फसवणूक; बिहारमधून चोरटे अटकेत

‘सहकार आयुक्तालयाचे हे स्तुत्य पाऊल आहे. सहकारी बँकांमध्ये व्यावसायिकता आणायची असल्यास या बँकांच्या संचालकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. आरबीआय ही नियंत्रणात्मक संस्था असल्याने त्यांना अपेक्षित संचालक मंडळाने काम करणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता शिक्षण, प्रशिक्षणाची गरज आहे. सहकार खात्याने सुरू केलेला उपक्रम चांगला आहे. बँकेच्या निर्णय प्रक्रियेत सर्व संचालकांचा सहभाग असल्यास सहकारी बँकांची निर्णय प्रक्रिया निश्चित सुधारेल’, असे महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे:अभाविपचे एमआयटीमध्ये आंदोलन

नागरी सहकारी बँकांना प्रशिक्षण देण्यासाठीचे मेळावे राज्यभर सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून आरबीआयचे नियम, कर्ज व्यवहार हाताळणे, सभासद वाढवणे, क्रेडिट मॉनिटरिंग सिस्टीम आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांशी स्पर्धा करायची असल्यास सहकारी बँकांना कामकाजात सुधारणा करावीच लागेल.– अनिल कवडे, सहकार आयुक्त