आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता, राज्यसभेतील गटनेता, खासदार संजयसिंह यांची येत्या शुक्रवारी (१६ सप्टेंबर) जाहीर सभा होणार आहे. स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी साडेचार वाजता ही सभा होईल, अशी माहिती आपचे राज्य संघटक, पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपचे शहर प्रवक्ता डॅा. अभिजीत मोरे, कनिष्क जाधव, सुजीत अगरवाल आणि किशोर मुजुमदार यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : लोनॲपवरील कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा केला खून ; वारजे भागातील घटना

अरविंद केजरीवाल मंत्रीमंडळातील मंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षाने कार्यकर्ता मेळावा घेऊन महापालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला होता. या सभेच्या माध्यमातून संजयसिंह आपच्या मिशन पुणे महापालिकेची मांडणी करणार आहेत. राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन, निवडणूक प्रभारी महादेव नाईक, राज्य प्रभारी दीपक सिंघला, प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, राज्य समितीतील पदाधिकारी, जिल्हा आणि शहर पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती आपकडे आहे, असे कुंभार यांनी यावेळी सांगितले.

Story img Loader