शिरुर : कचराची, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट करणारे सुसंस्कृत असतात असे सांगून विविध जागतिक समस्या आपल्या दारापर्यंत पोहचल्या असून या समस्यांच्या निराकारणासाठी लोकसहभाग महत्वाचे असल्याचे प्रसिध्द लेखक व भवतालचे संस्थापक अभिजीत घोरपडे शिरुर येथे म्हणाले.

शिरुर येथे सनशाईन क्लबचा वतीने घोरपडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर , पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे , प्रकाश बाफना आदी उपस्थित होते .

घोरपडे म्हणाले, समाज सुसंस्कृत होण्यासाठी देवाण घेवाणीची आवश्यकता असते. जगात चांगले घेणारा जो समाज असतो तो पुढे जातो. ग्लोबल वार्मिग व विविध पर्यावरणाचे प्रश्न लक्षात घेता सर्वानी पर्यावरण साक्षर होणे गरजेचे आहे. पर्यावरण साक्षरतेतून विविध प्रश्न सुटु शकतील दरवर्षी तापमानात वाढ होत असून जैव विविधतेचे प्रमाण ही कमी होत आहे सध्या कचरा ही मोठी समस्या बनली आहे. पृथ्वी माणसाची गरज भागवू शकते. परंतु कोण्या एका व्यक्तीची हाव भागवू शकत नाही.

वाढत्या प्लॅस्टिकचा वापर बाबत घोरपडे यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात नॅचरल हिस्टरी म्युझियम होण्याची आवश्यकता ही घोरपडे यांनी व्यक्त केली. यावेळी प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले. स्वागत प्रकाश बाफना यांनी केले.

Story img Loader