हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे शुक्रवारी झाले.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. हुतात्मा राजगुरू स्मारक समितीसह विविध संस्था व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर, अनंत गिते, गणेश बुधगावकर आदी त्या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रपती म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांचे टपाल तिकीट प्रकाशित करून देशातील हुतात्म्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. आढळराव-पाटील यांनी या तिकीट प्रकाशनासाठी केलेले प्रयत्न इतर खासदारांसाठी स्तुत्य आहेत. या तिकिटाचे प्रकाशन करताना मला आनंद होतो आहे. या प्रसंगी मी राजगुरूनगरच्या रहिवाशांचे अभिनंदन करतो.
आढळराव-पाटील प्रास्ताविकात म्हणाले, या टपाल तिकिटासाठी गेली सहा वर्षे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी हुतात्मा राजगुरू स्मारक समितीसह विविध संस्था व कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.
हुतात्मा राजगुरूंच्या टपाल तिकिटाचे राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत प्रकाशन
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे शुक्रवारी झाले. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. हुतात्मा राजगुरू स्मारक समितीसह विविध संस्था व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, गजानन बाबर, अनंत गिते, गणेश बुधगावकर आदी त्या वेळी उपस्थित होते.
First published on: 23-03-2013 at 01:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Publication of post ticket on hutatma rajguru by president