आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव, सिनेपत्रकार आणि चित्रपट चळवळीचे संयोजक सतीश जकातदार यांच्या निवडक लेखांचे संकलन असलेल्या ‘हकिकत सिनेमाची’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (२७ ऑक्टोबर) ग्रंथाली वाचक चळवळीचे अध्वर्यू दिनकर गांगल यांच्या हस्ते होणार आहे.
जकातदार यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीचे औचित्य साधून पराग प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव सुधीर नांदगावकर, व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते किरण शांताराम, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर उपस्थित राहणार आहेत. प्रकाशन कार्यक्रमानंतर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वाटचालीवर वंदना भाले निर्मित आणि सतीश जकातदार दिग्दर्शित ‘प्रिझव्र्हेशन ऑफ मुव्हिंग इमेजेस’ हा लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे, असे जकातदार मित्र परिवाराचे विजय जकातदार यांनी कळविले आहे.

Story img Loader