पुणे : दहावीतील विद्यार्थिनीचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना कोंढवा भागातील एका शाळेच्या आवारात घडली. मान्या पंडित (वय १५) असे हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. प्राथमिक तपासणीत मुलीचा मृत्यू हदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युमागचे निश्चित कारण समजेल, अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. मान्या कोंढवा भागातील संस्कृती शाळेत दहावीत होती. शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास मान्या बसमधून शाळेच्या आवारात उतरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिन्यातून ती तिसऱ्या मजल्यावर असलेल्या वर्गात निघाली होती जिन्यात ती बेशुद्ध पडली. मान्या बेशुद्ध पडल्यानंतर तिच्याबरोबर असलेले विद्यार्थी घाबरले. त्यांनी शिक्षकांना या घटनेची माहिती दिली. शिक्षक, तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने वानवडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा…पुणे : बदलापूर अत्याचार घटनेनंतर शाळा, महाविद्यालयातील प्रतिनिधींची बैठक

उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तिचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune 15 year old 10th class girl dies of suspected cardiac arrest at school in kondhwa pune print news rbk 25 psg