पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात संततधार पाऊस शनिवारी सकाळपर्यंत कायम आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला ४७०८ क्युसेकचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. चारही धरणांमधील पाणीसाठा १६.६८ अब्ज घनफूट (टीएमसी) ५७.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात १६.६८ टीएमसी पाणीसाठा –

चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात १०० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ६८ मि.मी, पानशेत धरण परिसरात ७५ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात ११ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात १६.६८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. शुक्रवारी रात्री चारही धरणांत १५.९४ टीएमसी पाणीसाठा होता. शुक्रवारी रात्रीच्या तुलनेत शनिवारी सकाळी तब्बल ०.७४ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बुधवारपासून खडकवासला धरण परिसरात तुलनेने पाऊस कमी झाल्याने या धरणातून मुठा नदीत ४७०८ क्युसेकचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत –

टेमघर                   १.६०      ४३.०४
वरसगाव               ६.९४      ५४.१४
पानशेत                 ६.१९      ५८.१४
खडकवासला        १.९६      ९९.१६
एकूण                    १६.६८   ५७.२४

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune 57 percent water storage in dams discharge continued at 4708 cusecs from khadakwasala pune print news msr
Show comments