पुणे : तब्बल सात फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा युवा शिल्पकार विराज खटावकर यांनी साकारलेला अश्वारूढ पुतळा आसाममधील जोराहाट येथे शिवजयंतीनिमित्त उभारण्यात येणार आहे. २१ पॅरा स्पेशल फोर्स, २१ वाघनखं परिवार आणि ऑल इंडिया एक्स सर्व्हिसमन वेल्फेअर असोसिएशन यांच्या पुढाकाराने २९ मार्च रोजी या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे.

नऱ्हे येथील शिल्पकार खटावकर यांच्या स्टुडिओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून हा पुत‌ळा आसामकडे रवाना करण्यात आला. लेफ्टनंट जनरल शिशिर महाजन, ब्रिगेडियर गोविंद इलंगोवन, ब्रिगेडियर पी. टी. घोगले, कर्नल एस. राजगोपाल, कॅप्टन स्वामीनाथन, मेजर बी. धामणकर, कर्नल एच.डी. खांडगे, कर्नल संभाजी पाटील, कर्नल राजगोपालन यांच्यासह समितीचे सुभेदार गोरख धमक, अध्यक्ष सुभेदार मेजर बाळू मोहारे, उपाध्यक्ष हवालदार पांडुरंग गोविंद आंब्रे, सचिव हवालदार संतोष चौधरी, खजिनदार सुभेदार नंदकुमार घोरपडे, हवालदार कल्याण माने, हवालदार जयवंत टकले या वेळी उपस्थित होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : राज्यातील शासकीय विद्यापीठांच्या आर्थिक स्थितीचा पहिल्यांदाच अभ्यास

विराज खटावकर म्हणाले, जोराहाट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एपॉक्सी आणि पॉलिस्टर रेसिंगमध्ये तयार करण्यात आला आहे. त्याचे वजन २५० किलो आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्यावर अफजलखान वधाचे चार फुटाचे भित्तीचित्र, चार बाय चार फुटांची राजमुद्रा आणि तीन बाय दोन आकाराचे वाघनखाचे भित्तीचित्र बसविण्यात आले आहे.

Story img Loader