पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तिघांची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मांजरी भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी ऑक्टोबर महिन्यात तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाला पैसे गुंतविण्यास सांगितले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १३ लाख सात हजार रुपये जमा केले. सुरुवातीला तरुणाला चोरट्यांनी परतावा दिला नाही. त्यानंतर परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गौड तपास करत आहेत.

Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ratnagiri, Shivaji Maharaj, historical treasure,
रत्नागिरी : राजापुरातील रायपाटण येथे सापडला शिवकालीन ऐतिहासिक ठेवा
painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

हेही वाचा – पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात

अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी लोहगाव भागातील एका व्यावसायिकाची ४७ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत. सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने कोंढवा भागातील एकाची १६ लाख ८४ हजार १९२ रुपयांची फसणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

हेही वाचा – शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?

वर्षभरात सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे किमान दोन ते तीन गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होतात.

Story img Loader