पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध दहा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांसाठी तब्बल ८१४१ एकर जमीन राखीव ठेवण्यात आली असून टप्प्याटप्प्याने भूसंपादन करण्यात येत आहे. प्रकल्प बाधितांना आतापर्यंत २६३५.०८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा- पुणे : संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. रामचंद्र देखणे यांचे निधन

दहा विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार

शहरासह जिल्ह्यात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६०, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्ग, चांदणी चौकातील उड्डाणपूल, महामेट्रो मार्गिका एक आणि दोन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) प्रस्तावित करण्यात आलेली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका, पुणे-मिरज रेल्वेमार्ग, बारामती-लोणंद नवा रेल्वे मार्ग, पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्ग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) करण्यात येणारा वर्तुळाकार रस्ता असे दहा विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडून या प्रकल्पांसाठी निधी देण्यात येत आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत या दहा प्रकल्पांसाठी ८१४१ एकर जमीन राखीव ठेवण्यात आली असून टप्प्याटप्प्याने भूसंपादन करण्यात येत आहे. तसेच दोन वर्षांत भूसंपादन करण्यात आल्यानंतर संबंधित प्रकल्पग्रस्तांना २६३५.०८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- पिंपरीः जनमत विरोधात गेल्याने सरकारला निवडणुकांची धास्ती – जयंत पाटील

आतापर्यंत १०२.०५ हेक्टर जमीन संपादित

दरम्यान, संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५) २१ गावांतून जाणार असून त्याकरिता १३६.२५ हेक्टर जागा आवश्यक असून आतापर्यंत १०२.०५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना मोबदल्यापोटी ४७१.८९ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५) ३९ गावांतून जाणार असून या प्रकल्पासाठी ३२४.७८ हेक्टर जागा आवश्यक आहे. आतापर्यंत २८९.०३ हे. जागा संपादित करण्यात आली असून मोबदल्यापोटी ७७७.७४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी १८.५६ हे. जागा आवश्यक होती. १०० टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले असून संबंधितांना ८१.४८ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. पीएमआरडीए मेट्रोसाठी साधारण १२ हे. जागेपाकी ७.१९ हे. जागा ताब्यात घेतली असून ५७.९८ कोटी रुपयांचे संबंधितांना वाटप करण्यात आले आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- पुणे : नवरात्रोत्सवात मराठवाडा , मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी ; कोकण , विदर्भात तुरळक ठिकाणीच पाऊस

प्रकल्प             गावे आवश्यक जमीन संपादित जमीन मोबदला (कोटींमध्ये)
पुणे-नाशिक महामार्ग ५२ २९७.४३             २८१.५९             ८४४.९१
पुणे-मिरज रेल्वे मार्ग १४ १८.०२ हे.            १६.०५ हे.             ४४.३०
बारामती-लोणंद रेल्वे मार्ग १३ १८४.५५             ९३.४६             १४७.१०
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग ५४ ४८०.४६             १०.०१             २०१
एमएसआरडीसी रिंगरोड ८३ १८२१.०३             ३.३१             ८.६८

Story img Loader