पुणे-सातारा बीआरटी मार्गावर स्टॉपवर थांबलेल्या पीएमपीएमएल बसला एका रिक्षा चालकांने जोरात धडक दिल्याची घटना घडली. तर या घटनेत रिक्षा चालक जखमी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे सातारा बीआरटी मार्गावरून (एमएच १४ सीडब्लूय २४७४) क्रमांकाची कात्रज ते भोसरी पीएमपीएमएल बस एसटी कॉलनीच्या समोर पावणे अकराच्या सुमारास आल्यावर तेथील बस स्टॉपवर थांबली.तेवढ्यात (एमएच १२ क्यू आर ३८३२) या क्रमांकाच्या रिक्षाने जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी जोरात होती की, रिक्षाच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. यामध्ये रिक्षा चालक रिक्षा चालक इस्माईल नदाफ जखमी झाले असून त्यांना जवळील रूग्णालयात तेथील नागरिक घेऊन गेले आहेत. तर या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली आहे.