पुणे : थेऊर परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकावर लोणी काळभाेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हारूल पंचानन बिश्वास (वय ५३, रा. काकडे बिल्डींग, पहिला मजला, थेऊर, हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बांगलादेशीचे नाव आहे. याबाबत दरोडा विरोधी पथकाचे अमोल विठ्ठल पवार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा – Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक

हेही वाचा – ठरले तर..! यावेळी होणार पुणे महानगरपालिकेचे विभाजन

हारूल बिश्वास याचा जन्म बांगलादेश येथे झाला आहे. १९७२ पासून तो बांगलादेशाचा नागरिक आहे. त्याच्याकडे भारतीय नागरिक असल्याबाबत कोणताही पुरावा नसताना ताे घुसखोरी करून भारतात आला. सुरुवातीला तो पश्चिम बंगाल, नंतर देशात विविध ठिकाणी राहिला. सध्या तो थेऊर येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. तो बांगलादेशाचा नागरिक असतानाही त्याने भारतातील बनावट जन्म प्रमाणपत्र तयार केले. तसेच भारतातील आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, शिधापत्रिका (रेशन कार्ड) तयार करून तो पुण्यातील थेऊर येथे वास्तव्य करताना आढळून आला. याप्रकरणी त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader