विवाहाच्या आमिषाने एका डॅाक्टर तरुणीची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका डॅाक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : बनावट पावती पुस्तके तयार करुन सोसायटीच्या नावाने वर्गणी ; तरुणाच्या विरोधात गुन्हा
डॅा. इम्रान इलाही मुलाणी (वय ४१, रा. चर्मकार गल्ली, सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका डॅाक्टर तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डॅाक्टर तरुणी आणि डॅा. मुलाणी यांची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी डॅा. मुलाणीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. तरुणी बंडगार्डन रस्त्यावरील एका नामांकित रुग्णालयात कामाला आहे. डॅा. मुलाणीने तरुणीच्या नावावर चार लाख सात हजार रुपयांचे कर्ज काढले होते.
हेही वाचा >>> पुणे : पीएमपी चालकाला बेदम मारहाण ; मुजोर मोटारचालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा
त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहास नकार दिला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर डॅा. मुलाणीने लज्जास्पद वर्तन करुन तिचा विनयभंग केला. तरुणीने पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे डॅा. मुलाणीला सांगितले. तेव्हा त्याने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. डॅाक्टर तरुणीने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी तपास करत आहेत.