पिंपरी : हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना भोसरीतील खंडेवस्तीत घडली. याप्रकरणी अमित महादेव घाटे (वय ३६, रा. खंडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल

हेही वाचा – पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित यांनी एका मित्राला हातउसने पैसे दिले होते. ते पैसे परत मागितले. त्या कारणावरून मित्राने त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने अमित यांच्या डोक्यात, पाठीवर आणि कपाळावर मारून जखमी केले. परत पैसे मागितले तर ‘तुला बघून घेईन’, अशी धमकी देखील दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Story img Loader