पुणे :‌ किरकोळ कारणावरून टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत पोलीस कर्मचारी धवल रविकांत लोणकर (वय३८, रा. भैरवनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विजय सूर्यकांत केंजळे (वय २८,) सूर्यकांत गणपतराव केंजळे (वय ५८), चंद्रकांत गणपतराव केंजळे (वय ५२), विशाल चंद्रकांत केंजळे (वय २४), निमेश किशोर जगताप (वय २१, सर्व रा. गुडविल संस्कृती सोसायटी, भैरवनगर, धानोरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – अजित पवारांनी स्वपक्षीय आमदारांचा निधी रोखला?

हेही वाचा – पुणे : वाहने फोडली तिथेच पोलिसांनी काढली धिंड, येरवडा पोलिसांची कारवाई

लोणकर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. लोणकर हे कुटुंबीयांसोबत मोटारीतून घरी निघाले होते. भैरवनगर भागातील गल्ली क्रमांक दहाच्या परिसरात एक जण अचानक मोटारीजवळ आल्याने लाेणकर यांनी मोटार थांबविली. आरोपी धवल लोणकर मोटारीजवळ आला. माझ्या अंगावर मोटार का घातली ? अशी विचारणा करून त्याने शिवीगाळ सुरू केली. लोणकर मोटारीतून उतरले. तेव्हा केंजळे, जगताप यांनी लोणकर यांना धक्काबुक्की केली. एका आरोपीने त्यांच्या चेहऱ्यावर वार केला. पोलीस उपनिरीक्षक गंपले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune a gang attacked a police for a minor reason ssb