नारायणगाव : अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या नागरिकांच्या गर्दीत नगरकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक शिरला. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू, तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावरील गुळंचवाडी (ता.जुन्नर) येथे शुक्रवारी ( दि. १९ ) रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – आरटीई प्रवेशांबाबत सरकारला दणका, निकालावर याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?

हेही वाचा – पिंपरी : वर्चस्वासाठी दोन्ही ‘राष्ट्रवादीं’ची चढाओढ

दरम्यान, अपघातातील जखमींची अधिकृत माहिती मिळाली नसून जखमीची संख्या वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावेळी ट्रकने महामार्गावर उभ्या असलेल्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली असून त्यांचे मोठे नुकसान केले आहे. जखमींना आळेफाटा व इतर भागातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संतप्त स्थानिक नागरिकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune a speeding truck rammed into the funeral crowd three people died incident at gulanchwadi pune print news rbk 25 ssb