नियोजित गृहप्रकल्पातील सोळाव्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील जयदेवनगर परिसरात घडली. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने बांधकाम ठेकेदाराच्या विरोधात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मीनाकुमारी साहू (वय ४१) असे मृत्यूमुखी पडलेल्या बांधकाम मजूर महिलेचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी ठेकेदार पवार शंकर भाई रेड्डी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राणी शिंदे यांनी या संदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
dumper and car accident on solapur road
सोलापूर रस्त्यावर डंपरची मोटारीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
crime
pimpri crime: कोयता गँग सक्रिय? शुल्लक कारणावरून कोयत्याने वार
Vasind police station, three employees Suspension,
वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
Badlapur School Case, victim girl Badlapur,
Badlapur School Case : अत्याचारानंतर वैद्यकीय तपासणीसाठीही चिमुकलीची फरफट
woman, self defense training, woman self defense,
स्वसंरक्षणार्थ…
parents worry about children studying at adarsh school in badlapur
शाळा सुरू मात्र पालकांच्या चेहऱ्यावर चिंता; बदलापूरच्या आदर्श शाळेत कडेकोट पोलीस बंदोबस्त

साहू मूळची छत्तीसगडमधील आहे. सिंहगड रस्त्यावरील जयदेवनगर परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. सोळाव्या मजल्यावर फरशी बसविवण्याचे काम सुरू होते. त्या वेळी तोल गेल्याने साहू सोळाव्या मजल्यावरुन इमारतीच्या आवारातील चरात (डक्ट) पडली. गंभीर जखमी झालेल्या साहूचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. चौकशीत ठेकेदाराने सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.