पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पतीने दिलेल्या त्रासामुळे एका महिलेने स्वयंपाकघरातील चाकूने स्वत:ला भोसकून घेतले. मंगळवार पेठेत ही घटना घडली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पतीला अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजा उर्फ सोनल विकी कांबळे (वय ३३, रा. बोलाईखाना, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विकी शंकर कांबळे (वय ३८) याला अटक करण्यात आली. पूजाची आई लक्ष्मी ज्ञानेश्वर सोनवणे (वय ५४, रा. गोपी मेडिकलजवळ, मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – पुणे : पुराच्या दूषित पाण्यामुळे आता धोका! महापालिकेच्या आरोग्य विभागाचा इशारा

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड : IAS पूजा खेडकर प्रकरणातील ‘त्या’ कंपनीचा लवकरच लिलाव होणार?

आरोपी विकी पत्नी पूजाच्या चारित्र्याचा संशय घेत होता. तिला तो शिवीगाळ करुन मारहाण करायचा. २२ जुलै रोजी साडेदहाच्या सुमारास विकीने वाद घालून पूजाला शिवीगाळ केली. तिला मारहाणही केली. त्यानंतर पूजाने स्वयंपाकघरातील चाकूने स्वत:वर वार केला. चाकू भोसकून घेतल्याने ती गंभीर जखमी झाले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. पतीने दिलेल्या त्रासामुळे मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद तिची आई लक्ष्मीबाई सोनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune a woman stabbed herself with a kitchen knife due to her husband trouble death of a woman husband arrested pune print news rbk 25 ssb