पुणे : शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या आवारातच एका १६ वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी मुले एकमेकांच्या ओळखीची नाहीत. संबंधित प्रकार सामूहिक अत्याचाराचा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ओम आदेश घोलप (वय २०), स्वप्नील विकास देवकर (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दोन अल्पवयीन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका १६ वर्षीय पीडित मुलीने तक्रार दाखल केली आहे. मुलगी एका नामांकित महाविद्यालयात अकरावीत आहे. एक आरोपी संबंधित महाविद्यालयात आहे. अन्य तिघे जण दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. समाज माध्यमांतून आरोपींची मुलीशी ओळख झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुलगी अल्पवयीन असल्याची जाणीव असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

हेही वाचा – Pune Metro : पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा महाविकास आघाडीचा इशारा; पुण्यात राजकारण तापलं

हेही वाचा – ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाबाबत अभिनेते प्रशांत दामले यांची खंत, म्हणाले…

अत्याचाराला वाचा कशी फुटली ?

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी संबंधित महाविद्यालयात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या होत्या. त्यांनी युवतींना महिला अत्याचार प्रकरणात जनजागृतीपर माहिती दिली. तेव्हा युवतीच्या एका मैत्रिणीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती त्यांना दिली, तसेच समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केल्याची माहिती तिने दिली. त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

Story img Loader