सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुणे शहरातील येरवडा येथील आहे. या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की भर सिग्नलवर एक दुचाकीस्वार ट्रकला जाऊन धडकला. मीडिया रिपोर्टनुसार या अपघातात दुचाकीस्वाराने त्याचे दोन्ही पाय गमावले आहे. हा धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर शहारा येईल. सध्या या अपघाताची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की जीएसटी भवन वरुन येरवडाला जाणाऱ्या रस्त्यावर गोल्फ चौक परिसरात सिग्नलवर वाहने थांबली आहेत. पण एक ट्रक सिग्नल तोडून जाताना दिसतो. तितक्यात डाव्या बाजूने येणारा एक दुचाकीस्वार सुद्धा सिग्नल तोडून उजव्या बाजूला जाताना दिसतो. यात दुचाकीस्वार ट्रकला जाऊन धडकतो. व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. विशेष म्हणजे ट्रक चालक आणि दुचाकीस्वार दोघेही सिग्नल तोडून जाताना दिसतात. त्यामुळे दोघांच्या चुकीमुळे हा अपघात घडतो. या अपघातात दुचाकीस्वाराने दोन्ही पाय गमावल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर क्षणभरासाठी चूक नेमकी कोणाची आहे, हे कळत नाही. पण व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते.

हेही वाचा : “आयुष्याच्या चित्रपटाला Once More नाही…” फक्त ३० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये आजोबांनी सांगितला जगण्याचा कानमंत्र

Roads of Mumbai या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमच्या मते, या अपघातासाठी कोण जबाबदार आहे? हा व्हिडीओ पुणे येथील आहे” यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी दुचाकीस्वार जबाबदार असल्याचे लिहिले आहे तर काहींनी ट्रकचालक जबाबदार असल्याचे लिहिलेय. एका युजरने लिहिलेय, “नक्कीच दुचाकीस्वाराची चुक आहे. तो चुकीच्या रस्त्यानी जात होता आणि रस्ता ओलांडण्यापूर्वी त्याने नीट तपासायला पाहिजे होते” तर एका युजरने लिहिलेय, “सिग्नलवर सर्व वाहने थांबलेले असताना सिग्नल तोडून ट्रक चालकाने जायला नको होते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “बसचालकाची पण तितकीच चूक आहे. झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबायला नको होती. अन्यथा हा अपघात टाळता आला असता”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune accident a biker broke signal while crossing road lost both legs in accident with truck jumping a red light signal at golf course chowk in yerwada truck bike accident pune video viral ndj