लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘मुलाने मोटार चालवायला मागितली तर चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस’, अशी सूचना बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांनी दिली होती, अशी माहिती अगरवाल यांच्याकडे काम करणाऱ्या मोटारचालकाने पोलिसांना दिली आहे. तसेच तांत्रिक बिघाड असतानाही अगरवाल यांनी मुलाच्या ताब्यात मोटार दिल्याचे उघडकीस आले आहे.

Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Vikramgad Assembly, Vikramgad Assembly Shivsena Rebellion,
पालघर : विक्रमगड विधानसभेतील शिवसेना बंडखोरीमुळे पालघरमधील महायुतीत वादाची ठिणगी
nandgaon assembly constituency
वंचितच्या नांदगाव माजी तालुकाध्यक्षांना माघारीसाठी धमकी

दरम्यान, कल्याणीनगर अपघात प्रकरणात विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) आणि जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा) या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा-Pune Accident : अजित पवार गटाचे आमदार आरोपीच्या अटकेनंतर मध्यरात्री पोलीस ठाण्यात का गेले? ठाकरे गटाचा सवाल

कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण आणि त्याची मैत्रीण मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. त्यानंतर मोटारचालक अल्पवयीन मुलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलाला मद्य उपलब्ध करून देणे, तसेच त्याला मोटार दिल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली. मुलाने ज्या पबमध्ये मद्यप्राशन केले होते. त्या पबमधील कर्मचारी शेवानी आणि गावकर यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पोलिसांनी अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या मोटाराच्या चालकाचा जबाब नोंदवला आहे. मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस, अशी सूचना अगरवाल यांनी दिली होती. अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल, पबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, त्या हॉटेल आणि पबममध्ये मद्य मिळते, याची माहीती अगरवाल यांना होती. त्यांनी त्याला मुलाला पार्टीला जाण्यास परवानगी दिली. पार्टीसाठी जाताना त्याला पैसे (पॉकेटमनी) दिले होते का? पार्टीसाठी अल्पवयीन मुलाला नेमके किती पैसे दिले होते किंवा क्रेडीटकार्ड दिले होते काय? अल्पवयीन मुलासोबत पार्टीसाठी आणखी कोण होते? याबाबत आरोपीकडे सखोल तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला.

आणखी वाचा-“साप-साप म्हणून भुई थोपटू नका”, पुणे अपघातावरून प्रशासनावर आरोप करणाऱ्या काँग्रेसला मुरलीधर मोहोळांचा टोला

गावकर आणि शेवानी यांनी आरोपी अल्पवयीन आहे की नाही, याची खातरजमा न करता त्यांना मद्यपान करण्याची परवानगी दिली, असे ॲड. विभुते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींच्यायावतीने ॲॅड. सुधीर शहा, ॲड. अमोल डांगे, ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर न्यायालयाने अगरवाल, शेवानी, गावकर यांना २४ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

तांत्रिक बिघाड असतानाही मोटार मुलाच्या ताब्यात

या प्रकरणातील परदेशी बनावटीची महागडी मोटार बंगळुरूतून खरेदी करण्यात आली होती. मोटारीत तांत्रिक बिघाड असल्याचे अगरवाल यांच्या निदर्शनास आले होते. तांत्रिक बिघाड दुरुस्त करून देण्याबाबत त्यांनी कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला होता. कंपनीने त्याची दखल न घेतल्याने याबाबत अगरवाल यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. तेथे दाखल असलेली तक्रार प्रलंबित आहे. त्यामुळे मोटारीची नोंदणी करण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. बचाव पक्षाच्या युक्तिवादावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. मोटारीत तांत्रिक बिघाड आहे होता, तर मोटार मुलाला चालविण्यासाठी का दिली? असा प्रश्न सरकारील वकील विद्या विभुते यांनी उपस्थित केला. मोटारीत तांत्रिक बिघाड असताना मुलाला मोटार चालविण्यास देणे ही गंभीर बाब असल्याचे ॲड. विभूते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

अगरवाल यांच्याकडून पोलिसांची दिशाभूल

कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी विशाल अगरवाल यांच्याशी संपर्क साधला. ते पुण्यात होते. मात्र, मी शिर्डीत आलो आहे, अशी खोटी माहिती त्यांनी पोलिसांना दिली, असे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी न्यायालयात सांगितले. अगरवाल यांना मंगळवारी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. अटकेतनतर त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाइल संच सापडला. या मोाबाइलमधील सीमकार्ड १९ मे रोजी वापरात आल्याचे आढळून आले आहे. अगरवाल यांनी त्यांचा मूळ मोबाइल संच लपवून ठेवला आहे. त्या मोबाइल संचात या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही पुरावे असू शकतात, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

आणखी वाचा-Pune Accident : “पालक म्हणून चुकलात, वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाहीत”, न्यायालयाने सुनावलं, अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना कोठडी

अगरवाल यांच्यावर शाईफेक

अगरवाल यांना बुधवारी दुपारी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाच्या आवारात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावेळी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत अगरवाल याला न्यायालयात नेले.