राज्यातील सध्याचे राजकारण खूप वाईट आहे. राज्यासाठी विकासासाठी असे राजकारण नक्कीच चांगले नाही. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे राजकारण वाईट होत आहे, अशी टीका शिवेसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी येथे केली. गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने राजकारणावर बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबईचा ऋषी बालसे ‘नीट’मध्ये सहावा ; राज्यातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

आदित्य ठाकरे गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये दाखल झाले. त्यावेळी ते बोलत होते. विसर्जन मिरवणुकीसाठी आल्यान राजकारणावर काही बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील आजचे राजकारण खूप वाईट आहे. ते राज्यासाठी विकासासाठी नक्कीच चांगले नाही. राजकारण खालच्या पातळीवर आले आहे. त्याचा स्तर वरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नीलमताई गोऱ्हे, चंद्रकांतदादा पाटील, अजितदादा भेटले. मात्र राजकारणा विषयी काही झाले नाही. उत्सवी वातावरण आहे. त्यामुळे राजकीय विषय नको, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune aditya thackeray in pune for ganpati darshan pune print news amy