सात वर्षांपूर्वी तिसरीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीसोबत तोंडओळखीतील एकाने अश्लील कृत्य केले होते. शाळेत समुपदेशनासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेने संबंधित मुलीची चौकशी केली. तेव्हा तिने सात वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी एकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत १५ वर्षीय शाळकरी मुलीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत मुलगी एका शाळेत दहावीत शिकत आहेत. शाळकरी मुलींना चांगल्या आणि वाईट स्पर्शाची माहिती देण्यासाठी समुपदेशन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी दहावीत शिकणाऱ्या मुलीने तिची व्यथा समुपदेशनासाठी आलेल्या महिला कार्यकर्त्यासमोर मांडली. पीडीत मुलगी तिसरीत असताना तोंडओळखीतील एकाने तिला घरी बोलावले. त्याने तिच्याशी अश्लील कृत्य केल्याची माहिती चौकशीत दिली. त्यानंतर मुस्कान संस्थेतील कार्यकर्त्यांनी तिला धीर दिला.

पीडीत मुलीने याबाबत नुकतीच उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक लुगडे तपास करत आहेत. पीडीत मुलीच्या शाळेत समुपदेशनाचा वर्ग आयोजित करण्यात आला होता. तेव्हा तिने समुपदेशकांना तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर मुस्कान संस्थेशी संपर्क साधून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा संशयित आरोपी त्या वेळी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, असे उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune after seven years the incident of rape of a school girl has been revealed pune print news msr