Pune Airline: पुण्यातून आता नवीन दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार आहेत. त्यामुळे आता पुणेकरांसाठी ही खुशखबर असणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (१९ सप्टेंबर) यासंदर्भातील माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय विमान सेवेमुळे पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर काय म्हटलं?
“पुणेकरांसाठी ‘गुड न्यूज’ पुण्याहून दोन नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या २७ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे”, असं मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Good news for Punekars; Two new international flights!
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 19, 2024
Delighted to announce that 27th October 2024 onwards, Pune-Dubai-Pune (daily) and Pune-Bangkok-Pune flights (thrice a week) will be operational from Pune International Airport.
Punekars & people of Western Maharashtra… pic.twitter.com/i3zEPzqzRb
कोणत्या दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पुणे शहर आणि परिसरासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यात आल्या आहेत. २७ ऑक्टोबर २०२४ पासून या दोन नवीन विमानसेवा सुरु होणार आहेत. यामध्ये पुणे-दुबई-पुणे अशी एक आंतरराष्ट्रीय विमानसेवा असणार आहे. तर दुसरी पुणे-बँकॉक-पुणे अशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा असणार आहे. दरम्यान, सध्या पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कार्यान्वित करण्याचेही काम पूर्ण झाल्यामुळे विमानसेवेला फायदा होणार आहे. तसेच पुणे विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पुणे-दुबई आणि पुणे- बॅंकॉक थेट विमानसेवा सुरु करण्यात आल्यामुळे प्रवाशांना या विमानसेवेचा लाभ होणार आहे.