पुणे : पुणे विमानतळ प्रवासी सुविधांमध्ये नापास ठरले आहे. विमानतळ सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळाचे स्थान घसरले आहे. विमानतळावरील प्रवासी संख्या वाढत असताना प्रवासी सुविधांचा दर्जा घसरत असल्याचे चित्र आहे. सुविधा अपुऱ्या पडू लागल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पुण्यातीलच असल्याने भविष्यात विमानतळाचा दर्जा सुधारण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

एअर पोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलच्या वतीने सर्वेक्षण करून विमानतळ सेवा गुणवत्ता (एएसक्यू) निर्देशांक जाहीर केला जातो. जगभरातील ९५ देशांतील ४०० विमानतळांचे सर्वेक्षण यासाठी केले जाते. यात देशातील १४ विमानतळांचा समावेश आहे. यंदा एप्रिल ते जून या तिमाहीतील सर्वेक्षणाच्या आधारे पुणे विमानतळ या निर्देशांकात ७६ व्या स्थानी घसरले आहे. पुणे विमानतळाला ५ पैकी ४.८१ गुण मिळाले आहेत. त्याआधीच्या जानेवारी ते मार्च तिमाहीत पुणे विमानतळ ७१ व्या स्थानी होते आणि विमानतळाला ४.८३ गुण मिळाले होते. त्यामुळे विमानतळावरील प्रवासी सुविधांचा दर्जा घसरल्याचे समोर आले आहे.

ST diesel buses will start in October mumbai news
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
iaf Sukhoi fighter plane
नवी मुंबई: डिसेंबरमध्ये विमानतळावरून पहिले उड्डाण ‘सुखोई’चे, तीन दिवसांपासून धावपट्टीच्या विविध चाचण्या
velankanni, passengers going to velankanni,
वेलांकन्नी येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
Muralidhar Mohol demanded Pune International Airport be named as Jagadguru Santshrestha Tukaram Maharaj
पुणे विमानतळाबद्दल मुरलीधर मोहोळ यांची मोठी मागणी, म्हणाले…
medical room, new terminal, Pune airport,
हवाई प्रवाशांवर आता तातडीने उपचार! पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष कार्यान्वित
Thermal scanning of passengers at Pune airport due to increasing risk of monkeypox pune
पुणे विमानतळावर प्रवाशांचे ‘थर्मल स्कॅनिंग’! मंकीपॉक्सचा धोका वाढताच आरोग्य यंत्रणांचे पाऊल 
Passenger facing problems despite opening of new terminal at Pune airport
शहरबात : पुणे विमानतळाचं करायचं काय?

हेही वाचा…पुण्यात झिकाचा धोका वाढला! ४ रुग्णांचा मृत्यू

सेवा गुणवत्ता निर्देशांकात विमानतळावरील ३१ महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला जातो. त्यात प्रवेशद्वाराजवळ बसण्यासाठी आसने, प्रवाशांना सहजपणे त्यांचा मार्ग सापडणे, विमानांच्या उड्डाणाची माहिती व्यवस्थित मिळणे, विमानतळ ते टर्मिनल अंतर कमी असणे, विमानतळ कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता, वाय-फाय सेवा गुणवत्ता, चार्जिंग स्थानकांची उपलब्धता, मनोरंजन अथवा विश्रामासाठी पर्याय, स्वच्छतागृहे, आरोग्यासंबंधी सुरक्षिततेची काळजी, स्वच्छता आणि वातावरण या इतर गोष्टींचा समावेश आहे. पुणे विमानतळाचे स्थान ३१ पैकी १६ सेवांमध्ये घसरले आहे.

घसरण नेमकी कुठे?

-चेक-इन क्षेत्र सहजपणे न सापडणे
-चेक-इन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता
-सुरक्षा तपासणीचा प्रतीक्षा कालावधी

-सुरक्षा कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता

-विमानतळावरील दुकाने

-सीमाशुल्क कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता

-विमानतळातील आसनव्यवस्था

-खानपान सेवेतील कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता

-वाय-फाय सेवा गुणवत्ता

-चार्जिंग केंद्रांची उपलब्धता

-मनोरंजन आणि विश्राम सुविधा

-स्वच्छतागृहांची उपलब्धता

स्वच्छ स्वच्छतागृहे

-आरोग्य सुरक्षा

-विमानतळावरील स्वच्छता

-विविध ठिकाणांना जोडणारी विमाने

हेही वाचा…पुणे: शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला शिक्षा

जगभरातील देश आपली विमानतळ सेवा सुसज्ज करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रवासी अनुकूल दर्जेदार सेवा व सर्वोत्तम प्रवासी अनुभव यावर भर देत आहेत. पुणे विमानतळावरून प्रवास करताना प्रवाशांना सुखद अनुभूती होईल याची काळजी विमानतळ प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. आता सुरू झालेले नवीन टर्मिनल प्रवाशांच्या अपेक्षांना खरे उतरेल, अशी आशा आहे. -धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ