केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) जवान महिलेसह दोघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोहगाव परिसरातील सीआयएसएफच्या वसाहतीत ही घटना घडली असून आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अस्मिता दास (वय ३०, मूळ रा. ओदिशा) आणि संजय कुमार (वय ३०, मूळ रा. उत्तरप्रदेश) अशी आत्महत्या केलेल्या जवानांची नावे आहेत. अस्मिता दास आणि संजय कुमार केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलात नियुक्तीस होते. दोघांनी त्यांच्या वसाहतीतील वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

दोघांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. या घटनेविषयी कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलाच्या पथकाकडे लोहगाव विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune airport security team cisf 2 workers committee suicide pune print news scsg