पुणे : विमानतळात प्रवेश करणे आणि तेथील सुरक्षा तपासणी सुटसुटीत व्हावी या हेतूने डिजियात्रा सुविधेचा वापर सुरू झाला. ‘डिजियात्रा’च्या माध्यमातून ‘फेशिअल रेकग्नेशन’ तंत्राच्या साहाय्याने प्रवाशांची ओळख पटवली जाऊ लागली. परंतु, अनेक विमान कंपन्यांनी ही सेवा सुरू न केल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. पुणे विमानतळावर लवकरच सर्वच विमान कंपन्यांचा डिजियात्रा सुविधेत समावेश केला जाणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे विमानतळावर डिजियात्रा सुविधा एप्रिलपासून सुरू झाली. मात्र, ही सुविधा सुरू होऊन सात महिने उलटल्यानंतर अद्याप एअर एशिया, अलायन्स एअर, स्टार एअर या कंपन्यांचा या सुविधेत समावेश नाही. त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. विमानतळावर प्रवेश करण्यात प्रवाशांचा त्यामुळे नाहक अधिक वेळ जात आहे. केवळ काही मिनिटांत डिजियात्राच्या माध्यमातून तपासणी पूर्ण होत असताना काही कंपन्यांचा यात समावेश नसल्याने प्रवाशांना खूप वेळ रांगेत उभे राहावे लागते. सध्या इंडिगो, विस्तारा, स्पाईस जेट, एअर इंडिया आणि आकासा एअर या विमान कंपन्यांचा डिजियात्रामध्ये समावेश आहे.

हेही वाचा – पुणे : धक्कादायक..! पेट क्लिनिकमध्येच गळफास लागून श्वानाचा मृत्यू

हेही वाचा – सणासुदीची वाहनखरेदी जोरात! जाणून घ्या पुणेकरांची पसंती कशाला…

विमानतळ प्राधिकरणाचा तातडीने प्रतिसाद

पुणे विमानतळावर अनेक कंपन्यांनी डिजियात्राची सुविधा सुरू केली नसल्याची बाब हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार यांना पत्राद्वारे निर्दशनास आणून दिली. कुमार यांनी या पत्रावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे, की सध्या पाच विमान कंपन्यांकडून डिजियात्रा सुविधा देत आहे. एअर एशियाचा लवकरच या सुविधेत समावेश होणार आहे. अलायन्स एअरकडे याबाबत पाठपुरावा केला जात आहे. स्टार एअरची सेवा अतिशय मर्यादित असून, त्यांच्या समावेशासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune airport will soon include all the airlines in the digiyatra facility stj 05 ssb