देशभरातील विजेच्या वारंवारितेबाबत निर्माण झालेल्या समस्येमुळे राज्यात ऐन विधानसभा निवडणुकांच्या कालावधीमध्ये काही ग्राहकांना वीजकपातीचा झटका बसतो आहे. पुणे व िपपरी-चिंचवड शहरामध्ये अद्यापि वीजकपातीची गरज भारलेली नाही. त्यामुळे शहरातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
महावितरण कंपनीकडून सध्या राज्यामध्ये १६ हजार ३०० ते १६ हजार ४०० मेगावॉटपर्यंत विजेची उपलब्धता करून देण्यात येत आहे. विविध स्रोतातून वीज घेऊन हा विक्रमी वीजपुरवठा करण्यात येत असल्याचे ‘महावितरण’ कडून सांगण्यात येत आहे. मोठय़ा प्रमाणावर वीजपुरवठा होत असला, तरी देशाच्या पातळीवर मागणीच्या तुलनेत विजेच्या पुरवठय़ाचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे विद्युत यंत्रणेची वारंवारिता खालावली आहे. याचा परिणाम म्हणून राज्यामध्ये काही ठिकाणी वीजकपात केली जात आहे. पारेषण यंत्रणेतील मर्यादेमुळे बाहेरून आणखी वीज आणण्यावर मर्यादा येत असल्याचेही ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे व िपपरी-चिंचवड शहरामध्ये अजून तरी वीजकपात झालेली नाही. मात्र, देशपातळीवरील परिस्थिती न सुधारल्यास या दोन्ही शहरातही वीजकपात केली जाऊ शकते. देशपातळीवर सध्या बहुतेक वेळेला विजेच्या यंत्रणांची वारंवारिता गंभीर स्वरूपाची असते. ही वारंवारिता आणखी खाली गेल्यास राज्यात काळोख होण्याची भीती महावितरण कंपनीकडूनच व्यक्त केली जात आहे.

Story img Loader