भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर 2024 रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्य़ात आज दिवसभर मुसळधार पावसाने झाल्याने अनेक ठिकाणी झाडपडी च्या घटना घडल्या आहेत.तर काही घरामध्ये पाणी जाण्याच्या घटना देखील घडल्या.तसेच या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली.
मात्र त्याच दरम्यान रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक आणि पुणे या पाच जिल्ह्यामध्ये पुढील २४ तास विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तर यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट हवामान विभागा मार्फत देण्यात आला आहे. आजचा पाऊस आणि हवामान विभागा मार्फत उद्याचा देण्यात आलेला अंदाज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनामार्फत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी घोषित केली आहे.