पुणे : आंदेकर टोळीतील गुंडाने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैभव चंद्रकांत गंगणे (वय २६, रा. सुमीत हाईट्स, १२७८, कसबा पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ देवदत्त आंदेकर (वय २५, रा. नाना पेठ) याला अटक करण्यात आली. त्याचे साथीदार गणेश अशोक वड्डू, आयुष बिडकर (दोघे रा. नाना पेठ), जयेश लोखंडे (रा. मंगळवार पेठ), पंकज वाघमारे (रा. हडपसर) यांच्यासह सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गंगणे याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा…पिंपरी : पवना धरण ५० टक्के भरले; पण पाणीपुरवठ्याच्या ‘या’ निर्णयात बदल नाही

गंगणे आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. सोमवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास गंगणे आणि त्याचा मित्र मंगळवार पेठेतील मोदी पेट्रोल पंप परिसरातून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्याला गाठले.

हेही वाचा…पुण्यातील बिबटे जाणार गुजरातला

शिवीगाळ करून आरोपींनी मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, फरासखाना विभागाचे सहायक आयुक्त ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.