एटीएमची तोडफोड करुन चोरट्यांनी रोकड चोरीचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा भागातील कडनगर परिसरात घडली.याबाबत आयसीआयसीआय बँकेच्या कडनगर शाखेचे व्यवस्थापक अन्वर तांबोळी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढवा भागातील कडनगर परिसरात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम केंद्र आहे. चोरटे मध्यरात्री पैसे काढण्याच्या बहाण्याने एटीएम केंद्रात शिरले.

हेही वाचा >>> पुणे : अजित पवार यांनी घेतली नाना पाटेकर यांची भेट ; डोणजे येथील फार्म हाऊसवर जाऊन गणरायाचे दर्शन घेतल्यावर दोन तास चर्चा

चोरट्यांनी एटीएम कटरने कापण्याचा प्रयत्न केला. एटीएममधून पैसे न निघाल्याने चोरटे पसार झाले. सकाळी एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तांबाळी यांनी पोलिसांंकडे तक्रार दिली. एटीएम केंद्राच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.

Story img Loader