-कृष्णा पांचाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या संकटाने अनेकांची स्वप्ने धुळीस मिळाली. अनेकांचा संसार विस्कटला, त्यांच्यावर मूळ गावी जाण्याची वेळ आली. काही जणांनी तर आर्थिक संकटातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील अपघातात दोन्ही पाय गमावलेला मराठमोळा नागेश गुलाबराव काळे हा तरुण लॉकडाउनच्या आर्थिक संकटात तग धरून आहे. तो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहे. आयुष्य हे खूप अनमोल आहे त्यामुळे आर्थिक संकटांना घाबरून आत्महत्या करू नका, असे आवाहन त्याने नागरिकांना केले आहे.

मार्च महिन्यापासून लागू झालेल्या लॉकडाउनमुळे राज्यासह पिंपरी-चिंचवडमधील व्यवसाय बंद होते. ज्यांचं हातावरच पोट आहे अशा लाखो नागरिकांना याचा थेट फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींनी मूळ गावी जाणे पसंद केले. तर काही जणांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असं बोललं जात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अपघातात दोन्ही पाय गमावलेला नागेश, करोनाच्या आर्थिक संकटातवर मात करून पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत आहे. नागेश हा रिक्षा चालवून आपले घर चालवत आहे. नागेश म्हणाला की, “गेल्या दहा वर्षापासून रिक्षा चालवत आहे. करोनाचं असं संकट कधीच पाहिलं नव्हतं, असं काही संकट येईल असंही वाटलं नव्हतं. पत्नी आणि आईसह भाड्याच्या खोलीत राहतो आहे. आर्थिक संकटावर मात करणे खूप गरजेचे आहे. आत्महत्या करू नका. असे आवाहन नागरिकांना करतो. हताश न होता मी रिक्षा चालवून कुटुंब चालवत आहे. दररोज 200 ते 300 रुपये मिळवत आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आयुष्य जगत असताना आत्महत्या करणे चुकीचे आहे. आयुष्य , जन्म एकदाच मिळतो. त्यामुळे आत्महत्या करू नयेत. लॉकडाउनचा काळ खूप खडरत होता. रिक्षा चालकाची अवस्था खूप वाईट झाली आहे. लॉकडाउनमध्ये रिक्षा बंद असल्याने आर्थिक संकटात सापडलो. पण, मात करणे गरजेचे होते. आपल्या एकट्यावर संकट आलेले नाही, सर्वांवर आलेले आहे. हा विचार मी केला. अन…! रिक्षा चालवायला पुन्हा त्याच जोमाने सुरुवात केली. रिक्षाच्या व्यवसायात अजूनही अडचणी आहेत. पहिल्या सारखा व्यवसाय राहिला नाही”,  असंही त्याने सांगितलं.

ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याने दोन्ही पाय गमावले :-

2013 ला मित्राला भेटून मुंबईहून पिंपरी-चिंचवडमध्ये आलो. रेल्वेतून उतरत असताना पाठीमागून कोणीतरी धक्का दिला. त्यामुळे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन च्या मध्ये पडलो या अपघातात माझी दोन्ही पाय गेले आहेत. पाय गेले याच दुःख न करता समाधानी कस राहता येईल हे पहिले आणि तीन महिन्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune auto driver nagesh kale who lost both legs in accident inspiring story kjp 91 sas
Show comments