पुणे : वडापाव आणि पुणेकर हे अनोखे समीकरण आहे. प्रत्येकाला वडा हा गरमागरम हवा असतो. एकाने गार वडापाव देताच डोके गरम झाले आणि रागाच्या भरात ग्राहकाने चक्क विक्रेत्यालाच मारहाण केली. या ‘गार वडापाव’वरून स्नॅक्स सेंटर चालकाला काचेची बरणी फेकून मारहाण केल्याची घटना बालेवाडी परिसरात घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वडापाव गार असल्याने तिघांनी विक्रेत्यावर केवळ काचेची भरणी फेकून मारली असे नाही. तर, चहाचा थर्मास फेकून देत तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय ४५, रा. बालेवाडी) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अंकुश कोंडिबा ढेबे (वय २३) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : हिंजवडी आयटीपार्कमधून उद्योग बाहेर का गेले? शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण, म्हणाले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी यांचे बालेवाडी परिसरातील साई चौक येथे शिवकृपा स्नॅक्स सेंटर आहे. त्याठिकाणी दुपारी बाराच्या सुमारास ढेबे आणि त्याचे दोन मित्र आले होते. त्यांनी वडापाव मागितला. वडापाव दिल्यानंतर तो गार आहे, यावरून वाद घातला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. त्यावेळी आरोपींनी दुकानातील चहाचा थर्मास खाली फेकून तो फोडला. तर, ढेबे याने काऊंटरवरील काचेची भरणी हातात घेऊन ती जोशी यांच्या दिशेने फेकून मारली. यात जोशी यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागला आहे. त्यानंतर तिघेही तेथून पसार झाले. गार वडापाववरून मारहाण झाल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.