पुणे : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी पकडले. महर्षीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळविली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. बांगलादेशी नागरिक गेले दहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी एहसान हाफिज शेख (वय ३४, सध्या रा. अरुणा असिफ अली उद्यानाजवळ, महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा कलम १४, पारपत्र अधिनियम, परकीय नागरिक आदेश, तसेच बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार सोमनाथ ढगे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – भाजप नेत्यांनी कान टोचताच शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शिलेदार नरमले, म्हणाले दिलगिरी..!

हेही वाचा – IndiGo Passengers : पुणे विमानतळावर इंडिगोच्या प्रवाशांना मनस्ताप! विमान वेळेआधी पोहचूनही सामानासाठी २ तासांचा उशीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. २०१४ मध्ये त्याने भारतात घुसखोरी केली होती. त्यांतर तो पुण्यात वास्तव्याला आहे. त्याने कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. स्वारगेट पोलिसांच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने महर्षीनगर परिसरात सापळा लावून शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पारपत्र जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळवली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bangladesh citizen caught in swargate area fake aadhaar card passport confiscated pune print news rbk 25 ssb