पुणे : पुणे शहर, तसेच जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत ॲड. हेमंत झंजाड यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजय मिळविला. झंजाड यांना तीन हजार ३२९ मते मिळाली.

शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल येथे शुक्रवारी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडली. शनिवारी पहाटेपर्यंत मतमोजणी सुरू होते. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत ॲड. समीर भुंडे यांना तीन हजार ३३६ आणि ॲड. सुरेखा भोसले यांना एक हजार ९२८ मते मिळाली. सचिवपदासाठी ॲड. पृथ्वीराज थोरात यांना तीन हजार १७४ आणि भाग्यश्री गुजर-मुळे यांना तीन हजार १५६ मते मिळाली. खजिनदार पदासाठी ॲड. इंद्रजीत भोईटे यांना दोन हजार १९३ मते मिळाली.

प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. गिरीष शेडगे, ॲड. विजयराज दरेकर यांनी काम पाहिले. अतिरिक्त निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अमोल जाधव, ॲड. अण्णासाहेब पवार, ॲड. सुप्रिया कोठारी, ॲड. सचिन झालटे पाटील, ॲड. अतुल पाटील यांच्यासह अकरा वकिलांंनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

हिशेब तपासणीसपदी ॲड. केदार शितोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दहा कार्यकारिणी सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे- ॲड. पूनम मावाणी, ॲड. माधवी पवार, ॲड. भारती नेवाळे, ॲड. प्रशांत पवार, ॲड. श्रीकांत चोंधे, ॲड. प्रसाद निगडे, ॲड. स्वप्नील जोशी, ॲड. आकाश गलांडे, ॲड. राज खैरे, ॲड. गणेश माने.

Story img Loader