पुणे : शहर आणि जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे. मतदार यादीतील त्रृटींमुळे निवडणुका पुढे ढकलण्याची नामुष्की पुणे बार असोसिएशनवर आली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यास विलंब, तसेच मतदार यादीतील एक हजार ८३७ वकिलांच्या नावांवर असोसिएशनच्या माजी अध्यक्षांसह वकीलवर्गाने आक्षेप घेतल्यानंतर मतदान पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री घेतला.

पुणे बार असोसिएशनची निवडणूक बुधवारी (३१ जानेवारी) पार पडणार होती. वार्षिक निवडणूकीसाठी सुमारे सात हजार ८०० वकील मतदान करणार होते. मतदार यादीत बनावट आणि पुण्याच्या बाहेरील वकिलांची नावे असल्याचा आरोप करण्यात आला होता. मतदानाच्या आदल्या दिवशी मंगळवारी (३० जानेवारी) वकीलवर्गाने एक हजार ८३७ वकिलांच्या नावांवर आक्षेप घेतला. त्याबाबतची छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी वेळ लागणार असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३ फेब्रुवारी रोजी मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. मतदार यादीवर ८ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येईल. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी मतदान आणि मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. दादाभाऊ शेटे यांनी दिली.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : “मग मला निवडणूक लढायला सांगायचं नव्हतं ना?”, छगन भुजबळांचा थेट अजित पवारांना सवाल
Congress and BJP both hypocrite over Situation of Dalits in India
डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत काँग्रेस व भाजपा दोघेही दुटप्पी; दलितांच्या प्रश्नांवर दोन्ही पक्ष उदासीन
constitution of india article 351
समोरच्या बाकावरून: राज्यघटनेसाठी काँग्रेसने काय केले?
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख

हेही वाचा…पिंपरी चिंचवड महापालिकेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी होणार भरती; दर बुधवारी उमेदवारांची घेतली जाणार मुलाखत

मतदार यादीतील अनेक वकील पुणे जिल्ह्याबाहेरचे आहे. ज्या सभासदांचे पुणे जिल्ह्याबाहेरील पत्ते आहेत. त्यांच्याकडे पुणे शहर, जिल्ह्यातील वास्तव्याचा पुरावा मागण्यात येणार आहे. त्यानंतर मतदारांची छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास वेळ लागणार असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. – ॲड. केतन कोठावळे, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

Story img Loader