लोकसत्ता वार्ताहर
बारामती : महावितरणच्या २०२४-२५ च्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत मागील सलग दोन वर्षांच्या सर्वसाधारण विजेत्या पुणे-बारामती परिमंडल संघाने सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारात २१ सुवर्ण व ९ रौप्य पदकांची कमाई केली. मात्र यंदा थोडक्यात सर्वसाधारण विजेतेपद हुकले व या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले.
बारामती येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेचा शनिवारी (दि. ८) सायंकाळी समारोप झाला. या स्पर्धेत कोल्हापूर संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर पुणे-बारामती संघाने व्हॉलीबॉल (पुरुष), खो-खो (पुरुष), कबड्डी (महिला), बॅडमिंटन (महिला) सांघिक खेळात विजेते आणि दोन वेळा टाय झालेल्या अतितटीच्या खो-खो (महिला) मध्ये उपविजेतेपद मिळवले.
स्पर्धेतील सर्व विजेता व उपविजेत्यांना महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक सर्वश्री परेश भागवत, दत्तात्रेय पडळकर, मुख्य अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार (पुणे), धर्मराज पेठकर (बारामती), दत्तात्रय बनसोडे, दिलीप दोडके, पवनकुमार कच्छोट, स्वप्नील काटकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महाव्यवस्थापक (मासं) राजेंद्र पांडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) व श्री. भुपेंद्र वाघमारे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये पुणे-बारामती संघातील विजेते व उपविजेते खेळाडू पुढीलप्रमाणे-
१०० मीटर धावणे : गुलाबसिंग वसावे (उपविजेता), २०० मीटर धावणे : पुरुष गट- गुलाबसिंग वसावे (विजेता), महिला गट– संजना शेजल (उपविजेती), ४०० मीटर धावणे : पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (विजेता), ८०० मीटर धावणे : महिला गट–संजना शेजल (उपविजेती), १५०० मीटर धावणे : महिला गट- अर्चना भोंग (उपविजेती), ४ बाय १०० रिले : पुरुष गट – प्रतीक वाईकर, गुलाबसिंग वसावे, अक्षय केंगाळे, सोमनाथ कांतीकर (विजेता) गोळा फेक : पुरुष गट – प्रवीण बोरावके (विजेता), लांब उडी : पुरुष गट– अक्षय केंगाळे (विजेता), महिला गट- माया येळवंडे (उपविजेती), टेनिक्वाईट : महिला दुहेरी– शीतल नाईक व कोमल सुरवसे (उपविजेती), टेबल टेनिस : पुरुष एकेरी – अतुल दंडवते (विजेता), बॅडमिंटन : पुरुष एकेरी– भरत वशिष्ठ (विजेता), पुरुष दुहेरी- भरत वशिष्ठ व सुरेश जाधव (विजेता), महिला एकेरी – वैष्णवी गांगारकर (विजेती), महिला दुहेरी – वैष्णवी गांगारकर व अनिता कुलकर्णी (विजेते), कुस्ती : ५७ किलो– आत्माराम मुंढे (विजेता), ६५ किलो- राजकुमार काळे (विजेता), ७९ किलो– अकिल मुजावर (विजेता), ८६ किलो– महावीर जाधव (विजेता), ९२ किलो– अमोल गवळी (विजेता), ९७ किलो– महेश कोळी (विजेता) आणि १२५ किलो– वैभव पवार (उपविजेता), शरीर सौष्ठव : ६५ किलो– विशाल मोहोळ (उपविजेता), पॉवर लिफ्टींग : ७४ किलो- मनिष कोंड्रा (विजेता).